
Outlook, Microsoft Teams, Azure, आणि Microsoft 365 यासह Microsoft सेवा संपूर्ण हिंदुस्थानात डाऊन झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंडिया टुडे टेक टीमला मायक्रोसॉफ्ट आउटलुकद्वारे ईमेल पाठवण्यात किंवा प्राप्त करण्यात समस्या येत आहेत, असं त्यांच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे. खरं तर, Outlook वेब आवृत्ती तसेच मोबाइल अॅप देखील अपडेट होत असल्यानं अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा अर्थ असा आहे की यूझर्सना नवीन ईमेल मिळू शकत नाही किंवा ते ईमेल पाठवू शकत नाहीत. त्यामुळे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत.
Twitter वर #MicrosoftTeams आणि #Outlook सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत आणि हजारो यूझर्स हे Microsoft प्लॅटफॉर्म वापरू शकत नसल्याची तक्रार करत होते. Twitter वर यासंदर्भात काही मीम्स देखील शेअर होत होते.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार Microsoft च्या सेवा रिस्टार्ट करण्यात आल्याअसून आता सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्या आहेत. Outlook आता चांगले काम करत आहे. या घटनेसंदर्भात मायक्रोसॉफ्टने एका ट्विटमध्ये लिहिले, ‘आम्ही नेटवर्किंग कॉन्फिगरेशन समस्यांपासून निर्माण झालेली समस्या विलग करण्यात यशस्वी झालो असून अन्य सेवांवर पडू नये यासाठी समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय शोधत आहोत’.