एक इंजिन बंद पडलं, दिल्ली-गोवा विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

indigo

दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे हवेत असतानाच एक इंजिन बंद पडले आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रसंगावधान दाखवत वैमानिकाने या विमानाचे मुंबईच्या छत्रपपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. रात्री 8 वाजता हे विमान दिल्लीतून निघाले होते. 9 वाजून 52 मिनिटांनी विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले.