गोव्याची वाटचाल मध्यावधीच्या दिशेने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Michael Lobo

 

सामना ऑनलाईन । पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाचे परिणाम सरकारवर होऊ लागले आहेत. प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सतत केला जात असतानाच आता उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारला घरचा आहेर देत सरकारमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गोवा मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने जात असल्याचे भाकीतदेखील लोबो यांनी केले. यामुळे सरकारला जोरदार धक्का बसला आहे.

विद्यमान भाजप आघाडी सरकार घडवण्यात लोबो यांची महत्त्वाची भूमिका आहे. लोबो हे सरकारसाठी किंगमेकर म्हणून ओळखले जातात. त्याच लोबो यांनी सरकारी नोकरभरती होत नसल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.  सध्याची स्थिती पाहता राज्य मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मत लोबो यांनी व्यक्त केल्याने भाजपची गोची झाली आहे.