नौदलाचे लढाऊ विमान अरबी समुद्रात कोसळले

430

हिंदुस्थानी नौदलाच्या मिग-29के विमानाला रविवारी अपघात झाला. गोव्याच्या किनाऱयापासून काही अंतरावर अरबी समुद्रात लढाऊ विमान कोसळले. विमानातून वैमानिक सुरक्षितरीत्या बाहेर पडल्याने बचावला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

गोव्यातील वास्कोमधील आयएनएस हंसा बेसवरून या मिग-29 के विमानाने उड्डाण केले होते. विमानाचा नियमित सराव सुरू होता. त्याच दरम्यान सकाळी 10.30 च्या सुमारास हा अपघात झाला. दुर्घटना घडण्याआधी वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.

गेल्या वर्षीही गोव्याच्या दाबोलिम विमानतळाकरून उड्डाण केलेले एक मिग-29वे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान कोसळले होते. या घटनेनंतर तीन महिन्यांच्या आत आणखी एक विमान कोसळले होते.

आपली प्रतिक्रिया द्या