नगर जिल्ह्यात अडकलेले मजूर एसटीने बंदोबस्तात रवाना

828

कोरानामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. म्हणून अनेक ठिकाणी स्थलांतरित मजूर अडकले आहेत. या मजुरांना घरापर्यंत पोहचविण्याचे काम सरकारने सुरु केले आहे. आज जिल्ह्यातील अनेकांना एसटी महामंडळाच्या वतीने  त्यांच्या मुळगावी पोहचविण्याचे काम करण्यात आले आहे.

राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मदतीचे हात पुढे येत आहे. अनेकांनी रोख स्वरुपात तर अनेकांनी परराज्यामधून अथवा पर जिल्हयातून आलेल्यांना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडले आहे.

आज जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व नगर जिल्हा पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना यवतमाळ, वाशीम व हिंगोली येथे सुरक्षित अंतर राखून पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. अनेक प्रवासी मजुरांनी सरकारचे तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या