मिलिंद एकबाटे यांच्यावर सासवडमध्ये चाकूहल्ला, 50 जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सासवड

भीमा-कोरेगाव दंगलीतील संशयित आरोपी व समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (63) यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांकर चाकूहल्ला झाला. पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी 40 ते 50 जणांकिरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकबोटे यांनी गोरक्षणाबाबत फेसबुककर लिहिलेल्या पोस्टकरून हा काद झाल्याची माहिती आहे.

पंडित मोडक, विवेक मोडक आणि निखिल दरेकर या तिघांसह 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोणालाही अटक झालेली नाही. एकबोटे हे मंगळवारी पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथील जळका मारुती मंदिरात प्रवचनाला गेले होते. प्रवचन सुरू असताना पंडित मोडक याने तेथे येऊन एकबोटे यांना ‘सासवडला राहायचे की नाही’ असा दम देत शिवीगाळ केली. त्यावेळी मोडक यांच्यासोबत 40 ते 50 तरुण होते. प्रवचन संपल्यावर जेवण करत असताना ते सर्व तरुण तेथे आले व पत्रावळीवर पाय देत एकबोटेंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि काही कार्यकर्त्यांना मारहाण केली. यावेळी एकबोटे आणि इतरांवर चाकूहल्ला झाला.