समुद्र किनाऱ्यावर नग्नावस्थेत धावला हा बॉलिवूड अभिनेता, बायकोने शेअर केले फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता व मॉडेलिंग विश्वातला मराठमोळा चेहरा मिलिंद सोमण आज समुद्रकिनाऱ्यावर नग्नावस्थेत धावताना दिसला. मिलिंदचा आज 55 वा वाढदिवस असून वाढदिवशी तो न्यूड होऊन धावला. त्याची पत्नी अंकिताने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मिलिंद सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून काही दिवसांपूर्वी त्याने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. थ्री इडियट फेम प्रसिद्ध इंजिनियर सोनम वांगचूक यांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ‘माझा मोबाईल चीनमध्ये बनलाय. येत्या एक आठवड्यात मी तो बदलतोय. आणि येत्या वर्षभरात मी माझ्या आयुष्यातील सर्व चीनी वस्तूंचा वापर बंद करणार आहे. चीन लोकांशी चीनशी आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही तर चीनी सरकारच्या वागणूकीचा आहे. मी पण तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या परिसरात, शहरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी जनजागृती करा. मी नेहमी बोलत आलो आहे की 21 व्या शतकात जीव द्यायचा नाही तर जीवन देण्याची गरज आहे’, असा संदेश वांगचूक यांनी व्हिडीओतून दिला होता. त्यांचा हा व्हिडीओ संदेश शेअर करत मिलिंदने चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे.