आरे केंद्रावर तत्काळ दूध उपलब्ध करून द्या; केंद्र संचालकांची मागणी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच आरेची सहउत्पादने तातडीने उपलब्ध करावीत, पेंद्र संचालकाने दैनंदिन दूधविक्रीची आगाऊ भरणा केलेली रक्कम परत करावी आणि थकीत रकमेबाबत निर्णय घेऊन निपटारा प्रमाणपत्र द्यावे, पेंद्र संचालकाकडून वसूल केलेले भुईभाडे तातडीने पालिकेकडे जमा करावे तसेच पेंद्र संचालकाच्या वारसाच्या किंवा मदतनिसाच्या नावावर पेंद्र हस्तांतरित करण्यात यावे आदी मागण्या आरे पेंद्र संचालकांच्या वतीने करण्यात आल्या.

बृहन्मुंबई दूध योजनाअंतर्गत कुर्ला दुग्धशाळा कार्यक्षेत्रातील सर्व आरे पेंद्र संचालकाची बैठक नुकतीच कुर्ला येथे पार पडली. या बैठकीला विभागातील बहुसंख्य पेंद्र संचालक उपस्थित होते. फेब्रुवारी 2022 पासून आरे पेंद्र संचालकाला आरे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा बंद आहे. आरेची सहउत्पादने 2015 पासून वितरित करणे थांबविले आहे. यामुळे आरे पेंद्र संचालक आर्थिक अडचणीत आला आहे. याशिवाय बृहन्मुंबई दूध योजनाद्वारे पेंद्रनिहाय पडताळणी सर्वेक्षण सुरू केले असून पेंद्र संचालकांच्या पेंद्रावर दंडात्मक कारवाईचे प्रकार सुरू आहेत, याकडे पेंद्र संचालकांनी लक्ष वेधले. यावेळी महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे उपाध्यक्ष सुहास शिवडवकर, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, सरचिटणीस सतीश सावंत, उपाध्यक्ष तानाजी आरज, सचिन रेखा संख्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सहकार्याध्यक्ष आदिनाथ हिरवे, प्रसाद नार्वेकर, रवींद्र पास्तेदेखील उपस्थित होते.

महाराष्ट्र दूध वितरक सेना केंद्र संचालकांच्या पाठीशी  

महाराष्ट्र दूध वितरक सेना गेल्या 25 वर्षांपासून आरे पेंद्र संचालकाच्या मागे खंबीरपणे उभी असून प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी मुख्यमंत्री, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री, बृहन्मुंबई दूध योजनेचे आयुक्त आणि महाव्यवस्थापक यांच्यासोबत पत्रव्यवहार केला आहे. महाराष्ट्र दूध वितरक सेना सर्व आरे पेंद्र संचालकाच्या वतीने न्यायालयात दाद मागण्याचा तयारीत आहे. फक्त आपली ताकद संघटनेच्या मागे ठेवा, असे आवाहन महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी केले.