महिनाभराच्या भाववाढीनंतर दुधाचे भाव पुन्हा वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिसेंबर 2019 मध्ये दुधाचे दर दोन रुपयांनी वाढले होते. आता या आठवड्यात पुन्हा दूध दोन रुपयांनी महाग होणार आहे.

दूधाचे उत्पादन कमी झाल्यामुळे पुरवठा त्या प्रमाणात होत नाहिये. तसेच शेतकर्‍यांनीही दूध जादा दराने विकण्यास सुरूवात केल्यानी दूध कंपन्यांनी दर वाढवले आहेत. एक लिटर दुधामागे दोन रुपये वाढवल्याची माहिती गोकुळ दुधसंघाचे अध्यक्ष अरुण नरके यांनी दिली. तसेच या दरवाढीचा फायदा शेतकर्‍यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली आणि मिरजमध्ये पूर आला होता. त्यामुळे दूध व्यवसयाला मोठा फटका बसल्याची प्रतिक्रिया दुध उत्पादकांनी दिली.

गोकुळकडे दिवसाला 13 लाख लिटर दूद संकलित होते. परंतु गेल्या काही दिवसांत हा आकडा साडे अकरा लाख लिटरवर आला आहे. मुंबईला दिवसाला 80 लाख लिटर दूध पुरवठा होतो. त्यात 35 लाख लिटर दूध हे सुट्या पध्दतीत विकले जाते. तर 45 लाख लिटर दूध हे बंद पिशवीत केले जाते. 15 लाख लिटर अमूल कडून पुरवठा केला जातो. तर गोकूळकडून दोन लाख तसेच नंदीनी आणि महानंदकडून प्रत्येकी दोन लाख लिटर दूध पुरवठा केला जातो.