
प्रसाद नायगांवकर, यवतमाळ
दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावं यासाठी राज्यात जनआंदोलन सुरू आहे.या आंदोलनाचे लोण यवतमाळ जिल्ह्यातील पुसदपर्यंत पोहोचले आहे. पुसदमध्ये शेतकऱ्यांनी भरचौकात म्हशींना दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे पुसदमधील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.


























































