दूध दोन रुपयांनी महागले

717

राज्यातील सहकारी व खासगी दूध संघाकडून गाईच्या दुधाच्या खरेदी दरात दोन रुपये वाढ करून हा दर 29 वरून 31 रुपये होणार आहे. तसेच गाईच्या व म्हशीच्या दूधविक्री दरात लिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दूध कल्याणकारी संघाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गाईच्या दुधाची विक्री 46 वरून 48 रुपये तर म्हशीच्या दुधाची विक्री लिटरला 56 वरून 58 रुपये होणार असून 11 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्यालयात कल्याणकारी संघाची बैठक झाली. अध्यक्षस्थानी कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के होते. यावेळी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ, खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर आणि सहकारी व खाजगी दूध संघाचे मिळून एकूण 73 दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या