गिरणी कामगारांचे शुक्रवारपासून आक्रोश आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यातील ‘एनटीसी’च्या सहा गिरण्या गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्यामुळे कामगारांना रोजीरोटी मिळणे मुश्कील असून याकर अकलंबून असलेल्या 25 हजार कुटुंबांची उपासमार सुरू आहे. न्यायालयाने गिरणी मालकांना ‘गिरण्या सुरू करा, अन्यथा कामगारांना 100 टक्के पगार द्या’ असे आदेश देऊनही कार्यकाही होत नाही.

केंद्र सरकारच्या या अनास्थेविरोधात राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात शुक्रवार, 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आक्रोश आंदोलन होणार असून मिल कामगार कुटुंबीयांसह सहभागी होतील. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोकिंदराव मोहिते यांनी पत्रकार परिषदेत गिरणी कामगारांची व्यथा मांडली.