जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सामना ऑनलाईन । शोपियन

जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अद्याप ती चकमक सुरू असल्याचे समजते. शोपियनमधील हांदेव गावात ही चकमक झाली

गुरुवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील दालिपोरा भागात जवान व दहशतावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. तर एक जवान शहीद झाला. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते.