अखेर मिमोह चक्रवर्ती अडकला लग्न बंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उटी

बॉलिवूडमधील एकेकाळचा डासिंग सुपरस्टार मिथून चक्रवर्तीचा मुलगा मिमोह उर्फ महाक्षय याच्यावर लग्नाच्या पाच दिवस आधी एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपानंतर मिमोहचे ७ जुलैला होणारे लग्न मोडल्याची चर्चा रंगली होती. मात्र मिमोह व त्याच्या प्रेयसीने ठरलेल्या तारखेच्या दोन दिवसांनंतर लग्न केले आहे.

मिमोह आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मा यांचे ७ जुलैला लग्न होणार होते. परंतु त्यापूर्वीच मिमोहवर एका भोजपूरी अभिनेत्रीने त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. पीडितने न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली होती. पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, मिमोहने २०१५ मध्ये शितपेयामध्ये अमली पदार्थ मिसळून बलात्कार केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारिरीक शोषण केले. या दरम्यान पीडित अभिनेत्री गर्भवती राहिली त्यावेळी मिमोह व त्याची आई योगिता बाली हीने जबरदस्ती तिचा गर्भपात घडवला.