पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर व लोणार तालुक्यासाठी सुसज्ज रूग्णवाहिका

846

युवासेना प्रमुख, तसेच राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने मेहकर मतदार संघातील मेहकर व लोणार तालुक्याला सुसज्ज रूग्णवाहिका मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी आज नगरविकास मंत्री तथा ठाणे व गडचिरोली चे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते या रूग्णवाहिकांच्या चाब्या स्वीकारल्या.

आदित्य ठाकरे यांच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने राज्यात 30 रूग्णवाहिकांचे लोकार्पण होत आहे. यातील एक सुसज्ज रूग्णवाहिका बुलढाणा जिल्ह्यातील रूग्णांच्या सेवेकरता मिळाली आहे. ही रूग्ण वाहिका मेहकर मतदार संघातील मेहकर व लोणार तालुक्यात कार्यरत राहणार आहे. याचा मोठा आधार रूग्णांना होणार आहे. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी चाबी व कागदपत्रे स्वीकारली. यावेळी शारंगधर अर्बनचे संचालक आंबादास सास्ते, स्वीय सहाय्यक रूपेश गणात्रा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय सहाय्यक माऊली धुळगंडे, अरविंद मांडवकर, सागर झाडे, नितीन हिलाल, निलेश देशमुख उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या