
भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना कोरोनाची लागण झाली आहे. साध्वी प्रज्ञा यांची प्रकृती बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
साध्वी निरंजन यांना गेल्या चार दिवसांपासून ताप येत होता. शुक्रवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना कानपूरमधील हॅलट रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले.




























































