राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत प्राथमिक आणि तातडीची-विजय वडेट्टीवार  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत प्राथमिक आणि तातडीची असल्याची माहिती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिली आहे. पूरग्रस्त 5 जिल्ह्यांमध्ये पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाला अंतिम रूप दिल्याची माहिती त्यांनी दिली असून शेतीचे पंचनामे युद्धस्तरावर केले जात असल्याचे  स्पष्ट केले आहे. कोकण अथवा पश्चिम महाराष्ट्रातील आपत्ती प्रमाणेच विदर्भातील पूरग्रस्तांना मदत दिली जाईल असा खुलासा त्यांनी केला. पुढील काही दिवसात या संबंधाने ठोस कारवाई केली जाणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.