
एका व्यक्तीकडे चाईल्ड पॉर्न असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी जेव्हा त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलीसही हादरले. पोलिसांना दोन वर्षापूर्वी हरवलेला लहान मुलगा या व्यक्तीच्या घरात सापडला.
जर्मनीतील ही घटना आहे. दोन वर्षांपूर्वी 15 वर्षाचा मार्विन घरातून बेपत्ता झाला होत. तेव्हा मार्विनच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु तो काही केल्या सापडला नव्हता. काही दिवसांपूर्वी त्याच भागात एक 44 वर्षाची व्यक्ती चाईल्ड पॉर्न मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर पसरवत असल्याचा पोलिसांना संशय आला होता. या संशयामुळे पोलिसांनी त्याच्या घरची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना दोन वर्षापूर्वी हरवलेला मार्विन त्याच्या घरी सापडला. सध्या मार्विनवर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू आहेत. ज्याच्या घरात मार्विन सापडला आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



























































