अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, मग झाला खळबळजनक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. जेव्हा या प्रकरणी खोलात चौकशी करण्यात आली तेव्हा एक खळबळजनक सत्य उघड झालं आहे.

रायसेन जिल्ह्यातील ओबेदुल्लागंज येथील आरोग्य केंद्रात या मुलीने बाळाला जन्म दिला. मात्र, मुलीची आणि बाळाची स्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिथे त्या बाळाचा मृत्यू झाला.

त्यानंतर हे प्रकरण पोलिसात दाखल झालं. तेव्हा या मुलीला बाळाच्या जैविक पित्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यानंतर एक भयंकर सत्य उघड झालं. तिला एक अल्पवयीन मुलगा लग्नाचं वचन देत होता. गेली दोन वर्षं तो तिला लग्नाचं वचन देऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता.

त्या संबंधांतून हे मूल जन्माला आलं होतं. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे.