अल्पवयीन मुलीने केला आपल्याच बाळाचा खून, बलात्कारानंतर झाला होता जन्म

1616
child

उत्तर प्रदेशमध्ये एका अल्पवीयन मुलीने आपल्या नवजात बाळाचा खून केला आहे. या प्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला अटक करण्यात आली आहे. मुलीवर बलात्कार झाला होता. त्यातून हे मूल जन्माला आले अशी माहिती तिच्या आईने दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी आणि तिची आई घरकाम करून आपला उदरनिर्वाह चालवायची. एका घरात 30 वर्षाच्या तरुणाने मुलीचा बलत्कार केला. आरोपीने मुलीला आणि तिच्या आईला धमकी दिली होती म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. नंतर पीडित मुलगी गरोदर राहिली. तिला मुलगी झाली होती. 31 जानेवारी रोजी दोघींनी मिळून त्या मुलीचा खून केला आणि एका तलावाजवळ फेकून तिथून पोबारा केला.

पोलिसांनी या प्रकरणी तपास करून पीडित मुलगी आणि आईचा शोध घेतला. तसेच दोघींना अटक केली आहे. पोलीस त्या बलात्कार आरोपीचाही शोध घेत असून पोस्को अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या