अल्पसंख्याक खात्याची टीम कश्मीरला जाणार, विकासकामांचा घेणार आढावा

243
प्रातिनिधिक फोटो

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर कश्मिरींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संभाव्य विकासकामांचा आढावा घेण्यासाठी अल्पसंख्याक खात्याची टीम 27 आणि 28 ऑगस्टला कश्मीरला जाणार आहे. यात कश्मीरमध्ये शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण विकास कार्यक्रम कुठे राबवण्यात येतील, याची माहिती घेण्यात येणार आहे.

टीममध्ये खात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सचिवांचाही समावेश आहे. केंद्र सरकार या सगळ्या प्रकल्पांना आर्थिक पुरवठा करणार आहे. कश्मीरमधील विकास प्रकल्पांनंतर जम्मू आणि लडाखमधील विकास प्रकल्पांचा आढावा घेणार आहे. दरम्यान, विरोधासाठी विरोध करणार्‍या राजकीय पक्षांनी याकडे संशयाच्या नजरेने न पाहू नये. विकासप्रकल्प सुरू झाल्यावर याला विरोध करणारेही आम्हाला पाठिंबा देतील, अशी खात्री आम्हाला आहे, असे अल्पसंख्याक व्यवहार खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या