
मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समिती आणि सविचारी संस्थांकडून मराठी मोर्चा काढण्यात येणार होताय. या मोर्चाला रितसर परवानगी मागितलेली होती मात्र पोलिसांनी ती नाकारली. त्यानंतरही मोर्चा काढण्यावर ठाम असलेल्या शिवसेना, मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र पोलिसांनी दडपशाहीचा वापर करत शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून प्रचंड राजकीय दबावाखाली पोलीस कार्यकर्त्यांची धरपकड करत आहेत. यामुळे मीरा भाईंदरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी एकिकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख व मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चा आधी ताब्यात घेतले होते. त्यानंतरही सकाळी दहा वाजल्यापासून मीरा रोड येथील बालाजी हॉटेल येथे शेकडो कार्यकर्ते जमले आहेत.