चानूचा नवा राष्ट्रीय विक्रम; पण कांस्यपदक मात्र हुकले

366

हिंदुस्थानची माजी जगज्जेती वेटलिफ्टर  मिराबाई चानू हिने गुरुवारी जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या 49 किलो वजनी गटात आपला राष्ट्रीय विक्रम मोडून काढला खरा; पण ही कामगिरी तिला पदक मिळवून देण्यासाठी पुरेशी पडली नाही. 25 वर्षांच्या मिराबाईला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

 तीनपैकी दोन प्रयत्नांत मिराबाईने आपल्या कामगिरीतील सर्वोत्तम वजन उचलले. स्नॅचमध्ये मिराबाईने 87 किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये 114 किलो वजन उचलले. असे एकूण २०१ किलो वजन मिराबाईने उचलले. मिराबाईचा याआधीचा राष्ट्रीय विक्रम आहे तो 199 (88 किलो+111 किलो) किलोचा आहे. ही कामगिरी तिने यंदा एप्रिलमध्ये पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत केली होती. चीनच्या जियांग हुइहुआने नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तिने 212 किलो वजन (94+118) उचलले. याआधीचा विश्वविक्रम चीनच्या होऊ झिहुईचा (210) आहे.

आपली प्रतिक्रिया द्या