शिरुर ताजबंद येथे 30 कट्टे रेशनचा गहू पकडला

480

सामना प्रतिनिधी। शिरुर ताजबंद

शिरुर ताजबंद येथे रेशनवरील धान्याचा काळाबाजार सुरू आहे. बुधवारी शासनाच्या पुरवठा विभागाचा 30 ते 35 गव्हाच्या कट्ट्यासह वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

पांढऱ्या खताच्या पोत्यात हा गहू भरण्यात आला होता. अंदाजे 30 ते 35 कट्टे गहू असून त्याचे वजन 16 क्विंटल असल्याचे तेथे जमलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितले. येथील बरेच व्यापारी परिसरातील रेशनचा माल घेऊन दररोज 200 कट्टे पाठवतात असे सांगितले जात आहे. शिरुर ताजबंद येथे पकडण्यात आलेला गहू आणि वाहन पोलीसांनी जप्त केले असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या