मिरजोळेतील त्या मृतदेहाची ओळख पटली, बेपत्ता निखील कांबळेचा खून

699

तालुक्यातील मिरजोळे करंदीकरवाडी येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी सापडला होता. छिन्नविछिन्न अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे कपडे, चप्पल आणि दप्तरावरुन ओळख पटली असून हा मृतदेह दहा दिवसांपुर्वी बेपत्ता असलेल्या मिरजोळे पाडावेवाडीतील निखील अरुण कांबळे या विद्यार्थ्याचा आहे.

निखील अरुण कांबळे हा 11 फेब्रुवारी रोजी दुपारी शाळेतून घरी आला आणि त्यानंतर संध्याकाळी क्लासला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. उशीरापर्यंत तो घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली. दुसर्‍या दिवशी त्यांनी निखिल बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. आज मिरजोळे गावातील करंदीकरवाडी येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत होता. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते. पण कपडे, चप्पल आणि दप्तरावरुन ओळख पटली. हा मृतदेह निखील कांबळे याचा असून निखील कांबळे याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा खून नक्की कोणी आणि कशासाठी केला या गोष्टीचा तपास पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या