मिरजोळेत अनोळखी मृतदेह सापडल्याने खळबळ

591

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे करंदीकरवाडी येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता हा मृतदेह आढळून आला.

मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश कदम आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सडल्यामुळे तो कुणाचा आहे याबाबत ओळख पटविणे कठीण झाले असून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या