
सामना ऑनलाईन । मुंबई
एजीपी वर्ल्ड या बॅनरच्या आणि सैफ हैदर हसन दिग्दर्शित ’मिररमिरर’ या नाटकाचा शुभारंभ एनपीसीएमध्ये 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही गोष्ट आहे मीनल आणि मान्या या अगदी सारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहिणींची. विशिष्ट परिस्थितीमुळे एखाद्या स्त्रीचे नशीब कसे पूर्णपणे बदलून जाते, त्याची ही कहाणी आहे. या नाटकाद्वारे अभिनेत्री मिनिषा लाम्बा प्रथमच नाटकात काम करणार आहे. मिनिषाचा कलाविष्कार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. खुर्चीवर खिळवून ठेवणारे हे नाटक प्रेक्षकांना अखेरच्या क्षणापर्यंत गुंतवून ठेवेल, असा विश्वास निर्माते अश्विन गिडवानी यांनी व्यक्त केला आहे. 75 मिनिटांचा एकपात्री अभिनय असलेले हे नाट्य मीनल आणि मान्या या बहिणींच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकते आणि ही भूमिका मिनिषा लांबा हिने साकारली आहे. या नाटकात तिने एकाचवेळी 13 पात्रं साकारली आहेत. पॉवर पॅक्ड, अतिशय बाणेदारपणे अभिनय करणारी मिनिषा लांबा यापूर्वी अशा भूमिकेत कधीही दिसली नव्हती.



























































