मिस कॉल द्या आणि मिळवा LPG कनेक्शन, जाणून घ्या काय आहे ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) ने LPG कनेक्शनसाठी नवीन सेवा सुरू केली आहे. या नवीन सेवेअंतर्गत ग्राहकांना फक्त एका मिस कॉलद्वारे नवीन गॅस कनेक्शन घेता येणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे या नवीन सेवेबद्दल माहिती दिली आहे.

कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘तुमचे नवीन इंडेन एलपीजी कनेक्शन फक्त एका मिस कॉलद्वारे जारी केले जाईल. यासाठी ग्राहकांना 8454955555 वर मिस कॉल द्यावा लागणार आहे. या सेवेद्वारे ग्राहकांना त्यांच्या दारात एलपीजी कनेक्शन मिळेल.’

तुम्ही मिस कॉल दिल्यानंतर कंपनी स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल. कंपनीने संपर्क केल्यानंतर ग्राहकाला आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची माहिती विचारली जाईल. नवीन कनेक्शनसाठी ग्राहकाला पत्त्याचा पुरावा देण्याचीही गरज नाही आहे.

कंपनीच्या नवीन नियमांनुसार, जर नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकाच्या कुटुंबातील आई -वडील, भावंडे किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाच्या नावावर आधीच एलपीजी गॅस कनेक्शन असेल. तर तो ग्राहक त्याच पत्त्यावर नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेऊ शकतो. मात्र, यासाठी ग्राहकाला गॅस एजन्सीच्या कार्यालयात जावे लागेल. यानंतर ग्राहकाला मागील गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील, ज्याची पडताळणी केली जाईल आणि ग्राहकाला नवीन कनेक्शन दिले जाईल.