बंगालच्या खाडीतून होणार मिसाईलची चाचणी, 24 आणि 25 सप्टेंबरला परिसर ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित

हिंदुस्थानातील बंगालच्या खाडीत एक महत्त्वपूर्ण क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी 24 आणि 25 सप्टेंबर असे दोन दिवस बंगालच्या खाडीतील काही भाग ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. ही चाचणी 140 किलोमीटरहून अधिक अंतराची असू शकते. शक्तिशाली आणि लांब पल्ल्याची मिसाईल असू शकते. या चाचणीसाठी डीआरडीओकडून मोठ्या क्षेपणास्त्राची तयारी करत आहे. ही चाचणी मध्यम किंवा लांब पल्ल्याची असू शकते. ज्यात अग्नी-प्राइम (अग्नी-पी) असे नाव समोर येत आहे. अग्नी-प्राइम एक नवीन जनरेशनच्या मध्यम अंतरावरची बॅलेस्टिक मिसाईल आहे. याची रेंज 1 हजार ते 2 हजार किलोमीटरपर्यंत आहे. 1400 किलोमीटरहून जास्त अंतर असू शकते. यासंबंधी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही एका मोठ्या मिसाईलची चाचणी असणार आहे. संरक्षण दलाला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने डीआरडीओने टाकलेले हे पाऊल आहे. गेल्या काही वर्षांत डीआरडीओने जबरदस्त प्रगती केली आहे.

काय आहे अग्नी-प्राईम

ज्या क्षेपणास्त्राची चाचणी होणार आहे. त्याचे नाव अग्नी-प्राईम असू शकते. ही मिसाईल हलकी, वेगवान आणि थेट हल्ला करणारी आहे. ही जुन्या मिसाईलच्या तुलनेत अत्याधुनिक आहे. अग्नी-प्राइमची रेंज 1 हजार ते 2 हजार किलोमीटरपर्यंत असू शकते. हिंदुस्थानच्या आसपास सुरक्षेत आव्हान निर्माण होत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानला मजबूत करणे गरजेचे आहे. अग्नी-प्राईममुळे हिंदुस्थानची पॉवर वाढेल. ही चाचणी आत्मनिर्भर संरक्षण कार्यक्रमाचा एक भाग असेल. चाचणीसाठी आवश्यक सुरक्षा प्रोटॉकॉल आणि तयारी पूर्ण केल्या जात आहेत.

याआधी कोणकोणत्या चाचण्या झाल्या

  • अग्नी 5 – 20 ऑगस्ट 2025 रोजी 5 हजार किलोमीटरपर्यंतच्या रेंजची मध्यम अंतरावरील बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी घेण्यात आली.
  • पृथ्वी 2 – ही आण्विक सक्षम असलेली छोटी बॅलेस्टिक मिसाईल आहे. याची मागील महिन्यात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • अग्नी 1 – हीसुद्धा आण्विक सक्षम छोटी अंतरावरची मिसाईल आहे. याची चाचणी काही दिवसांपूर्वीच झाली आहे.