अॅमेझॉन जंगलात हरवलेली मुले सापडली; महिनाभर भुकेल्या-तहानलेल्या अवस्थेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात महिनाभरापूर्वी दोन भाऊ हरवले होते. आता शोध लागला आहे. दोघांनी अन्नपाण्यावाचून दिवस काढल्याने ते अतिशय हडकुळे आणि अशक्त झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना ब्राझीलच्या मॅनिकोर येथे घडली. 18 फेबुवारी रोजी दोन्ही भाऊ पक्ष्यांच्या शिकारीसाठी घराबाहेर पडले होते. ते दोघे पामैरा जमातीतील आहेत. मोठा भाऊ 8 वर्षांचा असून त्याचे नाव ग्लेसन कार्व्हालो रिबेरो आहे. ग्लेको कार्व्हालो रिबेरो असे त्याच्या  6 वर्षांच्या लहान भावाचे नाव आहे. ते दोघे जवळपास 27 दिवस बेपत्ता होते. अॅमेझॉन वर्षावनात  लाकूड तोडणाऱ्या एका व्यक्तीने दोघा भावांना बघितले होते. तिथून त्यांना  बोटीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना विमानाने राजधानी मानौस इथे नेण्यात आले.