#mission begin again – लॉकडाऊन 5.0 मध्ये या गोष्टी होणार अनलॉक

1467

केंद्र सरकारने नुकतंच लॉकडाऊनचा पाचवा टप्पा जारी केला असून काही ठिकाणी सूट दिली आहे. राज्यातही केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी सूट देण्यात आली आहे.

नव्या लॉकडाऊनला mission begin again असे नाव देण्यात आले आहे. तसेच राज्यात तीन टप्प्यांत सूट देण्यात आली आहे. त्यात शासकी आणि खासगी कार्यालय काही प्रमाणात सुरू राहणार असून नागरिकांना ठराविक वेळेत बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. राज्याची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. पहिला कन्टेनमेंट झोन, दुसरा झोन मुंबई महानगर, पुणे महानगर, नागपूर आणि संभाजीनगर भागातील महानगर पालिका आणि तिसरा झोन हा उर्वरित भागात वर्ग करण्यात आला आहे. कन्टेनमेंट झोन भागात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. इथे कुठलीही सूट देण्यात आलेली नाही

पहिला टप्पा – 3 जून पासून या सेवा सुरू होणार

  • पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी सायकल चालवणे, फिरणे, जॉगिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात गार्डन, समुद्र किनार्‍यांचा समावेश आहे.
  • सरकारी कार्यालयात 15 टक्के कर्मचारी काम करू शकतात. पहाटे 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे कामकाज सुरू राहील
  • राज्य सरकारने गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे. तसेच घरी राहण्याचे आवाहन केले आहे.

दुसरा टप्पा – 5 जून पासून या सेवा सुरू होतील

  • कन्टेनमेंट झोन वगळता 5 जून पासून बाजार आणि दुकाने सम विषम तारखेनुसार सुरू राहतील. तर मॉल, शॉपिंग कॉम्प्लेस बंद राहतील. टॅक्सी, रिक्षा मध्ये फक्त दोन प्रवाशांना परवानगी असेल.
  • बाजारात एका दिवशी एका बाजुची तर दुसर्‍या दिवशी दुसर्‍या बाजूची दुकाने उघडी राहतील. ही दुकाने सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • कपड्यांच्या दुकानात ट्रायल रुम बंद राहतील, कारण अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता आहे.
  • दुकानदारांना आणि ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे कसोशीने पालन करावे लागेल.

तिसरा टप्पा- 10 जून पासून मिळणार सूट

  • 10 जून पासून खासगी कार्यालय सुरू राहतील. परंतु कार्यालयात फक्त 10 टक्के कर्मचारी असतील.
  • उर्वरित कर्मचार्‍यांनी घरून काम करणे गरजेचे आहे. तसेच संपूर्ण राज्यात जिल्हाबंदी लागू आहे.

पायी किंवा सायकले बाजारात जाण्याची परवानगी
जवळच्याच बाजारातून वस्तू विकत घ्या असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच बाजारात पायी किंवा सायकलने जाण्याची परवानगी सरकारने दिली आहे. बाजारात जाताना बाईक आणि कारचा वापर करण्यास सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच जर बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही केले तर बाजार बंद करण्यात येईल असा इशारा सरकारने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या