
टाइम मॅग्झिनने एआय क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांची यादी जाहीर झाली आहे. यादीत एलन मस्क आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यासारख्या मातब्बर लोकांची नावे आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आयआयटी चेन्नईचे असिस्टंट प्रोफेसर मितेश खापरा यांचे नावही या यादीत आहे. एआय क्षेत्रातील 100 प्रभावशाली लोकांमध्ये मितेश खापरा यांचे नाव समाविष्ट आहे. यानिमित्ताने मितेश खापरा यांच्या नावाची चर्चा होतेय. खापरा यांनी प्रादेशिक भाषांसाठी एआय तंत्रज्ञानची निर्मिती केली आहे.
प्रा. मितेश खापरा यांचा पूर्ण पह्कस हा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि मशील लार्ंनगवर आहे. त्यांनी हिंदुस्थानी भाषांसाठी ओपन सोर्स टुल्स आणि डेटासेट तयार करण्यावर काम केले आहे. प्रा. मितेश यांनी या कामात हिंदुस्थानी भाषा तंत्र विकसित करण्यावर भर दिलाय. हिंदुस्थानी भाषांमध्ये व्हॉईस टेक्नॉलॉजीवर काम करणारे बहुसंख्य स्टार्टअप कंपन्या मितेश आणि त्यांच्या टीमने तयार केलेला डेटासेट वापरत आहेत.
मितेश यांनी 2019 साली आयआयटी चेन्नई येथे ‘एआय4भारत’ नावाने संशोधन उपक्रम सुरू केला. त्याचा उद्देश हिंदुस्थानातील भाषांसाठी डेटासेट, मॉडेल आणि टुल्स बनवणे तसेच सर्वांसाठी ते विनामूल्य उपलब्ध व्हावे, असा आहे. यामध्ये देशातील 22 भाषांवर काम करण्यात आले. प्रा. मितेश खापरा यांच्या टीमने 500 जिह्यांचा अभ्यास दौरा केला आणि वेगवेगळ्या भागातील लोकांशी हजारो तास संवाद साधला. याविषयी प्रा. मितेश म्हणाले, 15 वर्षांपूर्वी लँग्वेज टेक्नॉलॉजीवर काम करणाऱ्या संशोधक अधिकतर इंग्लिश भाषेशी संबंधित समस्यांवर फोकस करत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता प्रादेशिक भाषांवर काम होत आहे.
‘एआय4भारत’च्या डेटासेटचा वापर केंद्र सरकारच्या ‘भाषिणी’या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात केला गेला. जागतिक स्तरावरील अनेक टेक्नॉलॉजी कंपन्यांनी हिंदी आणि मराठीसारख्या भाषांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ‘एआय4भारत’ साधनांचा वापर केला.