मिठी नदीमधील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात, 85 टक्के गाळ काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या माध्यमातून नालेसफाईचे काम वेगात सुरू असून मिठी नदीमधील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मिठी नदीच्या एकूण कामापैकी आतापर्यंत 85 टक्के गाळ काढण्यात आला असून पूर्व उपनगर आणि छोटय़ा नाल्यांची 60 टक्के सफाई पूर्ण झाली आहे. एकूण नालेसफाईच्या कामापैकी 62 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

मुंबईत भांडुप फिल्टर पाडा-विहार तलाक परिसरात उगम पावणारी मिठी नदी मुंबईतील महत्त्वाची नदी आहे. पूर्व उपनगरात 17.80 किमी वाहणारी मिठी नदी आरे कॉलनी, कुर्ला, वांद्रे परिसरात वाहत जाऊन माहीम खाडीजवळ समुद्राला जाऊन मिळते.

मुंबईत 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिकृष्टीत मिठी नदीचे पाणी शहरात शिरल्याने मोठे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मिठी नदीला पूरमुक्त करण्यासाठी किकिध उपाययोजना करण्यात येत आहेत. अतिकृष्टीत समुद्राला भरती असल्यास ओव्हर फ्लो होऊन पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. नदीकिनारी असलेल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ येते. यामुळे मिठी नदीचा ओक्हर फ्लो थांबवण्यासाठी 28 ठिकाणी मजबूत संरक्षक भिंत (फ्लड गेट) बांधून मुंबईची मिठी नदीच्या पुरातून मुक्तता करण्यात येत आहे. तर मिठी नदीमधील गाळ काढण्यासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे.

असे होतेय काम

पालिकेच्या माध्यमातून मिठी नदीचे सौंदर्यीकरण करून नदीला गतकैभक प्राप्त करून देण्यासाठी कार्यकाही सुरू आहे. यामध्ये मिठी नदीत जाणारे सांडपाणी रोखणे, किनाऱयावरील झोपडपट्टय़ांत शून्य कचरा मोहीम राबवणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.

तर नदीच्या खोल भागात जाऊन गाळ काढण्यासाठी नेदरलॅण्डची टक्शर एफ्मिबिअस मशीन आणि तरंगता कचरा काढण्यासाठी स्वीडनची सिल्ट पुशर मशीनही कापरली जात आहे.

किशेष म्हणजे नदीमधून काढलेल्या गाळाची किल्हेकाट लाकण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराकर निश्चित करण्यात आली असून गाळाच्या कजनानुसार पैशांचे अधिदान केले जाणार आहे.

असे झाले काम

मुंबईत मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदी मिळून पावसाळ्याआधी 907160.96 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे.

यापैकी आतापर्यंत एकूण 561950.94 मेट्रिक टन म्हणजे 61.94 टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.

मिठी नदीमधील 219968.31 मेट्रिक टन गाळापैकी 187602.84 म्हणजेच 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.

झालेल्या कामाची टक्केवारी

शहर 30 टक्के
पूर्व उपनगर 59 टक्के
पश्चिम उपनगर 52 टक्के
मिठी नदी 85 टक्के
छोटे नाले 58 टक्के