Mizoram Election Result 2023: मिझोराममध्ये झेडपीएम 26 जागांवर आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपने यश मिळवले आहे. तर सोमवारी मिझोराम निवडणुकीचा निकाल आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली. आतापर्यंतच्या निकालाचा कल बघता झेडपीएम ( झोरम पिपल्स मूमेण्ट) या पक्षाने 26 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे अंदाजानुसार मिझोराममध्ये झेडपीएम बाजी मारणार असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत सत्ताधारी असलेला ‘मिझो नॅशनल फ्रन्ट’ (एमएनएफ)  पिछाडीवर दिसत आहे.

मिझोराम निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झाले होते. आज मतमोजणीत 174 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.