दुष्काळी भागातील समस्या जाणून घेण्यासाठी क्षीरसागरांनी घेतली व्यापक बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता वीज, पाणी, जनावरांचे संगोपन, छावणी चालकांच्या समस्या, अन्न धान्य पुरवठ्याची समस्या जाणून घेण्यासाठी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यापक बैठक घेतली. बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील सर्व सरपंच, उपसरपंच, छावणी चालक, रेशन दुकानदार यांची व्यापक बैठक घेऊन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आता निवडणुका संपल्या आहेत. 23 मे ला निकाल लागणार असून निकाल महायुतीच्या बाजूनेच लागणार आहे हे आरशा इतके स्पष्ट आहे. निवडणुका असतील किंवा नसतील परंतू समस्या मात्र दुष्काळामुळे समोर आल्या आहेत. पाण्याचे मोठे संकट उभे असून जागोजागी पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. लोकसंख्या वाढली आहे जुन्या लोकसंख्येनुसार वाटप होणारे टँकर पुरेसे नाही त्यामुळे आपण पाठपुरावा करून आग्रहाची मागणी केल्यामुळे 10 टक्के टँकर वाढवून मिळाले आहेत. योग्य मागणीला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मकता मिळाली आहे, यामुळे मोठा आधार मिळाला आहे.

दुष्काळी परिस्थितीत गांभीर्याने प्रश्‍न सोडवून घ्यायचे आहेत. वीजेच्या बाबतीत अनेक ठिकाणी जुन्या तारा बदलणे, डि.पी.बसवणे ही कामे महत्वाची आहेत तसेच अशा परिस्थितीत प्रत्येक नागरीकाला आधार कार्डच्या आधारे धान्य पुरवठा करण्याची सूचना आपण केली आहे, असेही क्षीरसागर म्हणाले. दुष्काळी अनुदान, पिक विमा, बोंडआळी अनुदान हे सर्व पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने जमा व्हावेत यासाठी आपण जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली असून तांत्रिक अडचणींवर मात करून त्या सोडवण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असेही ते म्हणाले.