
राज्याच्या ग्रामीण भागांमधील लोडशेडिंग पूर्णपणे बंद करा आणि शेतीपंपांना पुरेशा दाबाने किमान आठ तास वीजपुरवठा करा, अशी मागणी शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. यावेळी त्यांनी धाराशीवमधील ग्रामीण भागांमध्ये सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 10 या वेळेत लोडशेडिंग केली जात असल्याचे सांगितले. 24 तासांपैकी फक्त 3-4 तासच शेतीपंपाला वीज दिली जाते. तीसुद्धा मधे मधे बंद केली जाते. पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याचे कैलास पाटील म्हणाले.




























































