दादा भुसे निगेटीव्हीटी असणारा मंत्री, ते आमदारांशी सरपंच समजून वागतात; महेंद्र थोरवेंनी सांगितलं नक्की काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. विधानसभेमध्येही याचे पडसाद उमटले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. या प्रकरणामुळे मिंधे-भाजप सरकारची अब्रु चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू असताना आता आमदार महेंद्र थोरवे यांनीच विधानभवनाच्या लॉबीमध्ये नक्की काय घडले याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

दादा भुसे यांच्या खात्यातील कामासंदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून मी पाठपुरावा करतोय. पण ते जाणीवपूर्वक टाळत आहेत. काल झालेल्या बोर्ड मिटिंगमध्ये त्यांनी खालापूर तालुक्यातील अन्य कामं घेतली, मात्र माझे काम घेतले नाही. त्यांनी जाणीवपूर्व हे काम घेतले नाही असा माझा आरोप आहे. याचाच जाब मी त्यांना विचारला तर ते त्यांनी आवाज वाढवला.

आम्ही स्वाभिमानी लोकं आहोत. मंत्र्यांनी प्रामाणिकपणे आमदारांची कामं करावीत. आम्ही तीन-साडेतीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो. अशा पद्धतीने आमचा स्वाभिमान विकणार नाही. हे जनतेचे काम असून मी काही तुमच्या घरी खायला येत नाही, असे म्हटल्याचे महेंद्र थोरवे यांनी सांगितले. यावर भुसे यांची देहबोली आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. त्यामुळे आमच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे थोरवे म्हणाले.

दादा भुसे आवाज वाढवून बोलले. मी आमदार आहे. माझ्याशी मोठ्या आवाजात बोलू नका. आमदारांमुळे हे मंत्री होतात, त्यामुळे त्यांनी आमदारांचा आदर ठेवावा. आम्ही जनतेच्या कामासाठी मंत्र्याकडेच पाठपुरावा करतो. पण मंत्री अशा पद्धतीने वागणार असतील तर राग येणारच नाही, असेही थोरवे म्हणाले.

सत्ताधारी आमदार-मंत्र्यामधील राड्याचा मुद्दा विधानसभेत गाजला; जयंत पाटील म्हणाले, ‘हे गँगवॉर आता..’

ते पुढे म्हणाले की, दादा भुसे निगेटीव्हीटी असणारे मंत्री आहेत. दादा भुसे आमदारांशी व्यवस्थित वागत नाहीत. ते आमदारांना सरपंच समजून वागतात. चुकीच्या पद्धतीने काम करतात. पण असे शिष्ट वागून चालणार नाही. जमिनीवर राहून काम केले पाहिजे, असा टोलाही थोरवे यांनी भुसे यांनी लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)