
सामना ऑनलाईन । कणकवली
कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे शहरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप करत गुरुवारी आमदार नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की व अरेतुरेची भाषा करीत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. या घटनेनंतर कणकवली पोलिसांनी राणे यांच्या ‘ओम गणेश’ या बंगल्यात जाऊन अवघ्या पाच तासांत आमदार नितेश राणे यांना अटक केली आहे.
Dikshit Gedam, SP, Sindhudurg: Nitesh Rane and two of his supporters have been arrested and search for other accused is on. They will be produced in court tomorrow https://t.co/arlggBoprg
— ANI (@ANI) July 4, 2019
गुरुवारी दुपारी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुला जवळ बोलावून घेतलं आणि शहरातील चिखल व सर्व्हिस रोडबाबत जबाबदार धरत त्यांना काहीही बोलू न देता धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या ओतून पुलाला बांधले. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी भा.द.वि कलम 353, 342, 332, 324, 323, 504, 506 अन्वये आमदार नितेश राणे व इतर 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. नितेश राणे यांच्या अटकेनंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली होती. उद्या शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Congress MLA Nitesh Rane: Now I will myself oversee the repair work on this highway, with a stick in my hand. Everyday at 7 am I will reach here. Let me see how does the Govt system win against us. We have the medicine to tackle their arrogance. https://t.co/QBPsx6B7kt
— ANI (@ANI) July 4, 2019
दरम्यान, या प्रकरणी नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना हा प्रकार चुकीचा असल्याचा सांगत माफी मागितली आहे.
Narayan Rane, Rajya Sabha MP on his son and MLA Nitesh Rane and his supporters attacking Govt officer: Why won’t I ask him to apologise? He is my son. If a father can aplogise for no fault of his, son will have to apologise https://t.co/RTffIgSL3w
— ANI (@ANI) July 4, 2019


































































