वेस्टर्न एक्सप्रेस हायवे घेणार मोकळा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
H

सामना प्रतिनिधी । मुंबई

सातत्याने वाहतूककोंडीने बदनाम असलेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आता मोकळा श्वास घेणार आहे. कलानगर ते दहिसरपर्यंत पसरलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सिग्नलचा अडथळा दूर करण्यात येणार असून या महामार्गाच्या खाली भुयारी अंडरपास तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना एमएमआरडीएने तयार केली आहे. मुंबईतून बाहेर पडायचे असेल किंवा विमानतळ गाठायचे असेल तर गर्दीच्या वेळेत वाहतुकीची जीवघेणी कोंडी सातत्याने पाहायला मिळत असते. यासाठी एमएमआरडीएने या मार्गावर ऍक्सेस कंट्रोल सिस्टम राबवीत हा मार्ग सिग्नल फ्री करण्याचे ठरविले आहे. तसेच सध्याची वाहनांची लेन ही ‘दीड लेन’ असून ती एकाच वाहनांसाठी करण्यात येणार असून लेनची शिस्त पाळावी लागणार आहे. या मार्गावर दिशादर्शक, ठिकाण दर्शक, वाहतुकीच्या सूचना देणारे साइन बोर्डही लावण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली आहे.