मनसेची 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बाळा नांदगावकर यांचे नाव नाही

10714

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली होती. यानंतर मंगळवारी 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नाशिक यांसारख्या शहरी भागातील मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे.

मनसे निवडणूक लढवणार 5 ऑक्टोबरपासून प्रचाराची सुरुवात

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे मात्र नाव पहिल्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  संदीप देशपांडे (माहीम), संजय तुर्डे (कलिना), नयन कदम (मागाठणे), कर्नबाळा दुबळे (चेंबूर), राजेश येरुणकर (दहिसर), अरुण सुर्वे (दिंडोशी), हेमंत कांबळे (कांदिवली पूर्व), विरेंद्र जाधव (गोरेगाव), संदेश देसाई (वर्सोवा), गणेश चुक्कल (घाटकोपर पश्चिम), अखिल चित्रे (वांद्रे पूर्व)या मुंबईतील तर अविनाश जाधव (ठाणे), गजानन काळे (बेलापूर), प्रमोद पाटील (कल्याण ग्रामीण), प्रकाश भोईर (कल्याण पश्चिम) या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

मनसेकडून निवडणूक लढवलेल्याला चोरीच्या आरोपाखाली अटक

आपली प्रतिक्रिया द्या