राज ठाकरे पावणे नऊ तासांनी ईडी कार्यालयातून बाहेर

1591

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी सक्तकसुली संचालनालयाने (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी चौकशी केली. सकाळी 11.30 वाजल्यापासून ते 8.17 वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. या चौकशीत त्यांना नेमके काय प्रश्न विचारण्यात आले हे समजू शकले नाही. यावेळी त्यांच्या मातोश्री, पत्नी, मुलगा अमित आणि त्याची पत्नी ईडी कार्यालयाबाहेर उपस्थित होत्या.

ed-office

दादर येथील कोहिनूर मिल नं. 3 चारशे एकवीस कोटींना खरेदी करून तेथे ‘कोहिनूर स्क्वेअर’ विकसित करण्यासाठी ‘कोहिनूर सीटीएनएल इफ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीने घेतलेल्या कर्ज प्रकरणात राज ठाकरे यांच्या सहभागाबाबत ईडीकडून तपास करण्यात येत आहे. यासाठी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सरकारी क्षेत्रातील कंपनी इफ्रास्ट्रक्चर लीजिंग ऍण्ड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला 860 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर आयएलएफएसला मोठे नुकसान झाले होते. त्या प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे.

दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना कलम 149 नुसार नोटिसा बजावल्या होत्या. तरीही शेकडो कार्यकर्ते परिसरात घोळक्याघोळक्याने दिसत होते.

आपली प्रतिक्रिया द्या