
पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून मनसेने सोमवारी सरकारविरोधात भांडुपमध्ये तीव्र आंदोलन केले. ‘बंद करा, बंद करा, जनतेचा छळ बंद करा’, अशा घोषणा देत मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
मनसे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मनसे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
संजय राऊत आंदोलकांना भेटले
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गाडी थांबवून या आंदोलकांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. रस्ता न अडवता आंदोलन केले जात होते. तरीही पोलीस अडवणूक करत होते. याबाबत पोलिसांशी संजय राऊत यांनी चर्चा केली.




























































