मनसेची तिसरी यादी जाहीर, 32 उमेदवारांची घोषणा

1755

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये 32 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत मनसेने 104 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

मनसेची 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बाळा नांदगावकर यांचे नाव नाही

मनसेने मंगळवारी आपली पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये 27 उमेदवारांचा समावेश होता. त्यानंतर बुधवारी जाहीर केल्या दुसऱ्या यादीमध्ये 45 उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ जाहीर करण्यात आले होते. आता तिसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे.

मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर, दुसऱ्या यादीतही नांदगावकरांचे नाव नाही

उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज माघे घेण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर प्रचारसभांचा धुरळा उडणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

मनसेची तिसरी यादी –

तिसऱ्या यादीमध्ये भांडूप, विक्रोळी, मुलुंड, वडाळा, उरण, पिंपरी, मिरा-भाईंदर, बार्शी, सांगोला, कर्जत-जामखेड, राजापूर, बदनापूर, मुरबाड, विक्रमगड, पालघर, ओवळा-माजिवडा, उमरगा, पुणे-कंटोन्मेंट, खेड-आळंदी, आंबेगाव, शिरूर, दौड, पुरंदर, भोर, चाळीसगाव, वसई, डहाणू, देवळाली, लातूर ग्रामीण, भंडारा, वरोरा  आणि भुसावळमधील उमेदवारांची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या