राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, मनसैनिक पोहोचताच केदार सोमण लपला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यातील कनाज भागात राहणाऱ्या केदार सोमण याने राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सोमण याला ‘चोप’ देण्यासाठी त्याचे घर गाठले. मात्र, सोमण घरात लपून बसला. कोथरुड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.