ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 1 डिसेंबरपासून मोबाईलवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 1 डिसेंबरपासून मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. कोअर आणि बफर झोनमध्ये पर्यटकांना आता मोबाईल नेता येणार नाही पण फोटो कॅमेराला परवानगी राहील. अलीकडे या प्रकल्पातील अनेक व्हीडीओ व्हायरल झाले होते. ज्यात वन्यजीव आणि पर्यटकांनाही धोका निर्माण झाल्याचं दिसून आलं. दुरून व्हीडीओ किंवा फोटो चांगले निघत नाही म्हणून पर्यटकांच्या जिप्सी व्हॅन वन्यजीवांच्या अगदी जवळ नेल्या जायच्या. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला.