पब्जी ऐवजी आता फौजी गेम ,अक्षय कुमार करणार निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने चिनी ऍप्सवर सर्जिकल स्ट्राईक चढवित दोन दिवसांपूर्वीछा 118 मोबाईल ऍप्सवर बंदी घातली. या बंदीत बहुचर्चित पब्जी या गेमवर देखील बंदी घालण्यात आली. पब्जी या गेम्सची जागा आता लवकरच फौ-जी हा नवा गेम घेणार आहे. अभिनेता अक्षय कुमार या गेम्सची निर्मिती करणार असून देशासाठी शहीद झालेल्या जवानांची माहिती देखील या गेम्सच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अक्षय कुमारने निर्मिती करणारा हा पहिला गेम्स वेंचर असेल. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर हिंदुस्थानाची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने नव्या फौ-जी गेम्सची घोषणा करण्यात आली आहे.

20 टक्के मोबदला वीर ट्रस्टला देणार

अक्षय कुमारने या नव्या गेम्सची घोषणा करताना यामाध्यमातून जो काही नफा होणार आहे. त्याचा 20 टक्के भाग जवानांसाठी काम करणार्या वीर ट्रस्टला देणार असल्याचे यावेळी जाहीर केले आहे.