मोबाईल इंटरनेट रिचार्ज करण्यास नकार, तरुणाची आत्महत्या

1160

मोबाईल ही आता गरज राहिली नसून व्यसन बनलं आहे, हा चित्रपटातील संवाद आता अनेकांचा अनुभव बनू लागला आहे. मोबाईल इंटरनेट रिचार्ज करून न दिल्याने निराश झालेल्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ही घटना घडली असून तरुणाचे वय 20 वर्षे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई वडिलांनी मोबाईल रिचार्ज करून दिल्याने तो निराश झाला होता. तो सातत्याने आई वडिलांकडे मोबाईलचे इंटरनेट रिचार्ज करून देण्यासाठी आग्रह धरून बसला होता. पालकांनी त्याची समजूत काढली, मात्र तरी देखील त्याने ऐकलं नाही. आईने त्याला इंटरनेट रिचार्ज न करून दिल्याने त्याने अखेर आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस अधिकारी एस शर्मा यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या