मोबाईल फोन महागणार, 3 टक्क्यांनी किंमत वाढण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारतर्फे मोबाईल फोनच्या डिस्प्लेच्या आयातीवर 10 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी येत्या काळात मोबाईल महागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मोबाइल फोनच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढतील, अशी माहिती इंडिया सेल्युलर ऍण्ड इलेक्ट्रानिक असोसिएशनतर्फे (आयसीईए) देण्यात आली आहे. यामुळे ऍपल, हुवाई, शाओमी, विवो आणि किनस्ट्रोन सारख्या मोबाईलच्या किंमतीवर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाईल फोनच्या टच पॅनल आणि डिस्प्लेवर येत्या 1 ऑक्टोबरपासून शुल्क आकारण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार त्याचा थेट फटका मोबाईलच्या किंमंतीवर बसणार असून त्यामुळे मोबाईलच्या किंमतीवर 1.5 ते 3 टक्के फटका बसण्याची माहिती आयसीईएचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज मोहिंद्रो यांनी दिली.

मोहिंद्रो पुढे म्हणाले, सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमुळे आपण देशांतर्गत मोबाईलसाठी लागणारी डिस्प्ले निर्मिती पुरेशा प्रमाणात करु शकलेलो नाही. देशांतर्गत उत्पादन काढाके, यासाठी आम्ही कटीबध्द असून त्यासाठी प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र त्यानंतरही यंदा डिस्पले निर्मितीच अनेक भाग आयात कराके लागले आहेत, त्यामुळेच या मोबाईलच्या किंमती काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.