
पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. सॅमसन डेव्हीड वड्डोल (वय 21, रा. तेलंगणा ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेमनाथ काळे (वय 32, रा. मांजरी बुद्रुक) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ 25 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हडपसर ते मुंढवा असा पीएमपीएल बसप्रवास करीत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत सॅमसनने त्यांचा मोबाईल चोरला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. चंदन अधिक तपास करीत आहेत.































































