Modak Recipe – माव्यासारखे मऊ आणि हेल्दी मोदक बनवण्याची सोपी रेसिपी

बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक हे सर्वांच्या घरी बनवले जातात. चला तर मग जाणून घेऊया सोप्या पद्धतीने मावा न वापरता माव्यासारखे मऊ मोदक बनवण्याची रेसिपी.

साहित्य

1/2 वाटी तांदळाचं पीठ
1 वाटी खोबऱ्याचा किस
1 वाटी गुळ
मिक्स ड्रायफ्रुट्स
1 चमचा भाजलेले खसखस, 1 चमचा पांढरे तीळ
तूप
वेलची पावडर
हळदीची पाने
दूध
चवीसाठी मीठ
जायफळ

 

 

 

मोदकाचे सारण करण्यासाठी –  सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप घाला. मंद आचेवर तूप गरम करुन त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून थोडं परतून घ्या. ड्रायफ्रुट्स थोडे लालसर झाल्यावर त्यामध्ये ओल्या नारळाचा किस आणि गुळ घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या. नंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ घालून चांगले परतवून घ्या. आणि गॅस बंद करुन शेवटी भाजलेले तीळ आणि खसखस घालून एक मिनिट परतवून घ्या.

 

 

 

उकड तयार करण्यासाठी –  सर्वप्रथम एक टोपमध्ये पानी घालून त्यामध्ये अर्धी वाटी दूध, तूप , 2 चमचे साखर आणि चवीपुरते मीठ घालून पानी गरम करुन घ्या. पाण्याला उकडी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळाच पीठ घाला आणि गॅस बंद करुन चांगले ढवळून घ्या. ही उकड 5 मिनिट झाकण ठेऊन मुरण्यासाठी ठेवा. त्यानंतर उकड एक प्लेटमध्ये काढून गरम गरम मळून त्याचा मऊसुत त्याचा गोळा बनवा.

 

 

 

मोदक बनवण्यासाठी  – सर्वप्रथम तांदूळाच्या पिठाचा गोळा घेऊन थोडी मध्यम आणि पुरीच्या आकाराची पोळी लाटून घ्या. त्यानंतर त्या पोळीमध्ये खोबऱ्याचं सारण घालून तूपाच्या साहाय्याने कळ्या पाडून मोदकाचा आकार द्या. हे मोदक स्टिमरमध्ये पाणी गरम करुन त्यामध्ये हळदीची पाने ठेऊन मोदक वाफवून घ्या. तयार आहे तुमचे माव्यापेक्षा जबरदस्त मऊ आणि सुवासिक मोदक हे गरम गरम मोदक तुपासोबत सर्व्ह करा.